News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, १७ डिसेंबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ नंदीश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

ॐ भगवते नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारामंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

मिथुन

ॐ अधोक्षाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग – पांढरा

कर्क

ॐ शामदेवाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग –गडद पिवळा

सिंह

ॐ जगद्‌पालकाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग -नारंगी

कन्या

ॐ शशिधराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
आजचा रंग –नेव्ही ब्लू

तुळ

ॐ उमाकांताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचे दिवस आहेत.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ गिरीधराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी.
आजचा रंग –पोपटी

धनु

ॐ अग्निनारायणाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

मकर

ॐ श्रीनिधये नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

ॐ हरिहराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यवसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग- राखाडी

मीन

ॐ गुरूवे नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 17 december 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, १६ डिसेंबर २०१७
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५ डिसेंबर २०१७
3 आजचे राशीभविष्य, गुरूवार, १४ डिसेंबर २०१७
Just Now!
X