27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-
अचानकपणे काही लाभ संभवतात. जोडीदाराचा सुस्वभाविपणा दिसून येईल. काही वेळेस कंजूसपणा दाखवाल. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा. फार विचार करत बसू नका.
वृषभ:-
बौद्धिक दिमाख दाखवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अवाजवी अपेक्षा न केलेल्याच बऱ्या. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन:-
नातेवाईकांचा प्रेमळ सहवास लाभेल. काही भाग्यकारक घटना घडतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. हाताखालील लोकांचे सौख्य लाभेल. कामाचा उरक वाढेल.
कर्क:-
तुमचा मान वाढेल. बौद्धिक छंदाला अनुकूल वातावरण लाभेल. योग्य तर्क कराल. मैदानी खेळास चालना मिळेल. कामात सातत्य दाखवाल.
सिंह:-
उत्तम गृहसौख्य लाभेल. स्त्रियांना गृहिणीपदाचा मान मिळेल. वाहन सौख्य चांगले लाभेल. घरातील कामांना वेग येईल. वडिलधाऱ्यांचे मत विचारात घ्यावे.
कन्या:-
घरात तुमचे प्रभुत्व राहील. कलेला प्रोत्साहन मिळेल. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. जोमाने कामे कराल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
तूळ:-
गैरसमजुतीतून वाद संभवतात. सामुदाईक वादात अडकू नये. पायाचे विकार बळावू शकतात. उष्णतेचा त्रास जाणवेल.
वृश्चिक:-
घरातील वातावरण भक्तिपूर्ण राहील. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल. मोठ्या लोकांचा पाहुणचार कराल. कामातील उर्जा वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनु:-
मनातील चुकीच्या विचारांना बाजूला सारावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. तुमची इच्छा पूर्ण होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला कंटाळू नका.
मकर:-
चिंता व्यर्थ आहेत. एखाद्या कामातील अपयशाने खचून जावू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी राखावी. मदतीचा आनंद मिळेल.
कुंभ:-
उष्णतेचे विकार जाणवतील. महिलांनी आरोग्यास जपावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. मुलांचे मत समजून घ्यावे. अचानक धनलाभाची शक्यता.
मीन:-
एकमेकांचे विचार जाणून घ्यावेत. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. गुह्यभागाचे विकार बळावू शकतात. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. पित्ताचा त्रास जाणवेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 03 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३० सप्टेंबर २०१९
Just Now!
X