07 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २४ जून २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका.

वृषभ:-नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. अति श्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.

मिथुन:-दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.

कर्क:-दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

सिंह:-मनाची चलबिचलता जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.

कन्या:-चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्व‍कीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो.

तूळ:-भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.

वृश्चिक:-अनाठायी खर्चाला आवर घालावी. कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका.

धनू:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा. कष्ट करूनच यश हातात पडेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे॰

मकर:-शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी मनमोकळा प्रेमालाप कराल. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल. जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील.

कुंभ:-नवीन कामातून समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल.

मीन:-दिवस चांगला जाईल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 12:46 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 24th june 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २३ जून २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २२ जून २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २१ जून २०२०
Just Now!
X