Shardiya Navratri Ashtami 2023: संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु आहे. माता जगदंबेच्या व्रताचा शारदीय नवरात्र उत्सव हा भारतासह जगभरातील सुद्धा एक प्रमुख सण आहे. नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचे पूजन या सणादरम्यान केले जाते. नवरात्रीत महाअष्टमीला विशेष महत्त्व असते. यंदा २२ ऑक्टोबर २०२३ ला रविवारी महाअष्टमीची तिथी जुळून आली आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदा अष्टमीच्या तिथीला अनेक शुभ राजयोग सुद्धा जुळून आले आहेत. शारदीय नवरात्रीतील अष्टमीला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ मध्ये राहून शश राजयोग तयार करत आहेत. तर २२ ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग सुद्धा तयार होत आहेत. शनिकृपा व लक्ष्मीच्या आशीर्वादाने हे राजयोग तब्बल १०० वर्षांनी तयार झाले आहेत. तसेच उद्यापासून दिवाळीपर्यंत काही राशींच्या कुंडलीत प्रभावी असणार आहेत. यामुळे नेमक्या कोणत्या राशीला कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया..
१०० वर्षांनी नवरात्रीत अष्टमीला तीन राजयोग; तुमच्या राशीला होणार का धनलाभ?
मेष रास: मेष राशीच्या मंडळींना नवरात्रीच्या अष्टमीपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत अत्यंत शुभ कालावधी अनुभवता येईल. हा काळ तुमच्या इच्छापूर्तीचा ठरू शकतो. तुमच्या वैवहिक आयुष्यातील अडचणी व अडथळे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित धनलाभाचे योग्य आहेत. तुम्हाला संतती प्राप्तीचे सुद्धा योग दिसत आहेत.
वृषभ रास: वृषभ राशीचे अडकून पडलेले पैसे लवकरात लवकर परत मिळू शकतील. तुम्हाला समाजातील मान- सन्मान अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या कालावधीत तोच मान टिकवून ठेवण्यासाठी काही मोठी पाऊले उचलू शकता. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन कर्जमुक्त होता येऊ शकते. तुम्हाला या कालावधीत प्रियजनांसह प्रवासाची संधी आहे.
कर्क रास: कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग दिसत आहेत. तुम्हाला सामाजिक जीवनात बदल घडून आलेले दिसतील. आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला नशिबाची साथ मिळून कामे मार्गी लागू शकतात. गुंतवणुकीला प्राधान्य द्या. तुमच्या संभाषण कौशल्याने तुम्ही अनेकांची मने जिंकू शकता.
हे ही वाचा << २८ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचे नशीब चांदण्यासारखं चमकणार; या दिवशी नेमकं काय होणार, कसा होईल धनलाभ?
मीन रास: मीन राशीच्या व्यक्तींना राजयोगामुळे पद- प्रतिष्ठा लाभू शकते. अचानक व अनपेक्षित धनलाभाचे सुद्धा योग आहेत. तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्यांची संख्या व क्षमता वाढू लागेल त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा प्रचंड भार हलका होईल. नियोजन व शिस्तबद्धतेकडे लक्ष द्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)