10th April 2024 Panchang & Horoscope: १० एप्रिलला म्हणजेच आज चैत्र शुक्ल द्वितीयेला भरणी व कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशी द्रिक पंचांगानुसार प्रीती योग जुळून येत आहे. चैत्र नवरात्रीची सुद्धा आज द्वितीया तिथी असणार असून दिनविशेष पाहायला झाल्यास आज श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन साजरा होत आहे. आजच्या दिवशी राशीचक्रातील १२ राशींच्या कुंडलीत नेमकं काय लिहून ठेवलंय हे ही पाहूया..

१० एप्रिल २०२४ मराठी पंचांग: दिनविशेष व राशी भविष्य

मेष:-मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.

12th April Panchang Rashi Bhavishya First Vinayak Chaturthi
१२ एप्रिल, विनायकी चतुर्थी: नववर्षात वृश्चिक, तूळसहित ‘या’ राशींना अचानक धनलाभाचे योग, १२ राशींचे भविष्य वाचा
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
4th April Panchang Rashi Bhavishya Guruvaar
४ एप्रिल राशी भविष्य: गुरुवारी श्रवण नक्षत्रात मेष ते मीन पैकी कुणाचे नशीब चमकणार? धन, आरोग्य कसे असेल?
6th April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
६ एप्रिल पंचांग: शनीप्रदोष तुमच्या राशीसाठी काय फळ देणार? दुपारी ‘हा’ ४६ मिनिटांचा मुहूर्त आहे सर्वात शुभ

वृषभ:-कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्ट ता वाढेल. प्रेम सौख्यात भर पडेल.

मिथुन:-व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त पाने वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.

कर्क:-सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.

सिंह:-प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.

कन्या:-आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नाका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट पाने सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.

तूळ:-नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.

वृश्चिक:-व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधि उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.

धनू:-जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.

मकर:-गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.

कुंभ:-चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.

हे ही वाचा<< चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

मीन:-दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर