Rashi Bhavishya In Marathi, 12 July 2025 : आज १२ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया आहे. द्वितीया रात्री १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत विष्कंभ योग जुळून येईल. उद्या रात्रीपर्यंत म्हणजेच ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ९ मिनिटांनी सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. शनिवारी शनिदेव आज तुम्हाला कसा आशीर्वाद देणार जाणून घेऊया…

१२ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 12 July 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अति विचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. नवीन ओळखी होतील.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

चिंतामुक्त जगावे. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

दिवसभर कामात गुंग राहाल. आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते. शेअर्स च्या कामात यश मिळेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

जोडीदाराशी अनबन होऊ शकते. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात यश येईल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल. मनातील मरगळ काढून टाकता येईल. करमणुकीत वेळ घालवावा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. आवडी-निवडी बाबत अधिक काटेकोर राहाल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर