Horoscope Today In Marathi, 13 August 2025: आज १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी उद्या संध्याकाळपर्यंत दुपारी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत असेल. संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत धृति योग जुळून येईल. सकाळी १० वाजून ३३ मिनिटांपर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असेल त्यानंतर रेवती नक्षत्र सुरु होईल. आज राहू काळ १२:३० वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घेऊया…
१३ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 13 August 2025)
मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
मानसिक दडपण कमी होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान-सन्मानात वाढ होईल.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
जवळच्या व्यक्ति भेटतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. धाडस व पराक्रमात वाढ होईल.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. मनाची चंचलता जाणवेल.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)
नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. कौटुंबिक काळजी सतावत राहील.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
मनातील संभ्रम काढून टाकावेत. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.
मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर