13th May 2024 Panchang & Rashi Bhavishya: १३ मे २०२४ ला वैशाख शुक्ल षष्ठीला नव्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. आज सकाळी ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत पुनर्वसू नक्षत्र जागृत असणार आहे. आजचा दिवस शूल योगासह शुभ ठरणारे आहे. आज पंचांगानुसार मेष राशीत सूर्य व कर्क राशीत चंद्र विराजमान असणार आहे. आजचा एकूण दिवस शुभ असला तरी प्रत्येक राशीला नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल हे पाहूया..

१३ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.

Shukra Gochar 2024
१५ दिवसांनी ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? शुक्रदेवाच्या कृपेने चारी बाजूंनी होऊ शकते धनवर्षा
22nd June Panchang & Rashi Bhavishya
२२ जून पंचांग: मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना आज नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात लाभेल लक्ष्मी कृपा; शनिवारी तुमचं नशीब कसं चमकणार?
Win and Live, Pursue Dreams,
जिंकावे नि जगावेही : पाठपुरावा स्वप्नांचा!
14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
golden age of these zodiac signs
येत्या २ दिवसात सुरू होईल ‘या’ राशींचा सुवर्णकाळ, सूर्यासारखे उजळेल नशीब!
Ganesh Chaturthi 2024 This Year's Ganesh Chaturthi Dates When Is Ganeshotsav Starting
२०२४ मध्ये गणपती बाप्पा कधी येणार? तारीख लक्षात ठेवा; मुंबईत लागले बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, VIDEO व्हायरल
। 7th June Panchang Mesh To Meen Rashi Will Earn More Money
७ जून पंचांग: दिवसभर कमाई ते इच्छा पूर्ती; वृषभ, कन्या सहित आज १२ पैकी या राशींना धनलाभाचे योग, वाचा तुमचं राशी भविष्य
शनी जयंती, ६ जून पंचांग: मेष ते मीन, कुणाला लाभेल शनीची कृपा; तन- मन- धनाने कुणाची होईल प्रगती? वाचा १२ राशींचे भविष्य

वृषभ:-हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.

मिथुन:-पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.

कर्क:-अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

सिंह:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.

कन्या:-मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

तूळ:-सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.

वृश्चिक:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

धनू:-तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान शोधावा.

मकर:-शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.

कुंभ:-सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

हे ही वाचा<< २१ दिवस ‘या’ ४ राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण; अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळपासून बुध देणार बुद्धी व धनाचे दान

मीन:-मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर