Horoscope Today In Marathi, 15 July 2025: आज १५ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रात्री १० वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत पूर्वभाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ मिनिटांनी सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर मंगळवारी तुमच्या आयुष्यात काय नवे घडणार जाणून घेऊया…

१५ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 15 July 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

बोलतांना संयम राखावा. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मनातील धैर्य वाढवावे लागेल. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

फार रोखठोक भूमिका घेऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. उगाच घुसमट होऊ देऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल. वेळ हातची जाऊ देऊ नका. ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. कामाच्या विस्ताराचा विचार कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आर्थिक गणित जमून येईल. जुनी गुंतवणूक कमी येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

बोलतांना इतरांची मने दुखवू नका. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. क्रोधवृत्तीत वाढ होईल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर