Bhaubeej Shubh Muhurta, Date, Tithi: भाऊ बहिणीच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या दोन सणांपैकी एक म्हणजे भाऊबीज. यंदा अधिक श्रावण असल्यामुळे एरवी ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला येणारा भाऊबीजेचा सण १० दिवस पुढे ढकलला गेला होता. अजूनही काहींना भाऊबीज नेमकी १४ तारखेला आहे की १५? असा प्रश्न पडला असेल. तर कार्तिक शुद्ध द्वितीयेचा उदय तिथीनुसार भाऊबीजेचा सण हा यंदा १५ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. भाऊबीज नेमकी का साजरी केली जाते व यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त किती वाजता आहे याविषयी जाणून घेऊया..

भाऊबीज का साजरी केली जाते?

पौराणिक कथांनुसार, यमाची बहीण यमुना हिने अनेकदा आपल्या भावाला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र यम ही मृत्यूची देवता असल्याने तो बहिणीच्या सासरी जाणे टाळत असे. पण बहिणीच्या मायेपोटी वर्षातील एक दिवस यम तिच्या सासरी भेट घ्यायला जाण्याचे वचन तिला देतो. त्या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया असल्याने भाऊबीजेचा सण हा यम द्वितीया म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमुनेने यमाचे औक्षण केल्यावर त्याने तिला काय हवे असे विचारले असता तिने दरवर्षी तू माझ्या घरी एकदा यायचंस आणि या दिवशी जी बहीण तिच्या भावाला ओवाळेल तिच्या भावाचं रक्षण करायचंस असं वरदान मागितलं. या दिवसापासून मग भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची परंपरा सुरु झाली.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त फक्त दोन तास..

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल. याच्या उदया तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीज सण साजरा केला जाईल.

हे ही वाचा<< तुळशीच्या लग्नापर्यंत आदित्‍य मंगल योग बनल्याने लक्ष्‍मी माता ‘या’ राशींचे दार ठोठावणार; ‘या’ मार्गे होऊ शकता मालामाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दोन तासांच्या कालावधीत बहिणीने भावाला ओवाळणे शुभ ठरेल.