Surya Nakshatra Gochar In Revati: प्रत्येक महिन्यात सूर्याचे गोचर होत असते. सूर्य ज्या राशीत असतो त्या राशीवर संक्रांत येते असं म्हणतात, त्यानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत विराजमान असतो तेव्हा मकरसंक्रांत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा सूर्यदेव हे सध्या मीन राशीत असून पुढील १७ दिवस म्हणजेच १३ एप्रिलपर्यंत इथेच स्थिर असणार आहेत. तत्पूर्वी ३१ मार्चला सूर्याचे रेवती नक्षत्रात गोचर होणार आहे. पुढील राशी परिवर्तन होण्याआधी १७ दिवसात सूर्याचे बळ वाढू शकते. यामुळे प्रभावित राशींना सर्वोतपरी लाभ होण्याची चिन्हे आहेत. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना येत्या काही दिवसात कशा पद्धतीने लाभ होऊ शकतो हे पाहूया.

१३ एप्रिलपर्यंत ‘या’ राशींना सूर्याचे बळ लाभणार, बरसेल धनवर्षा

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

मीन राशीमधील सूर्याचे स्थान हे वृषभ राशीच्या फायद्याचे सिद्ध होऊ शकते. अडकून पडलेली कामे पूर्णत्वास जाण्याची सुरुवात होईल. तुमच्या करिअरमध्ये मोठी भरारी घेण्यासाठी एखाद्या मोठ्या प्रकल्पात योगदान देण्याची संधी मिळू शकते. कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास घडण्याचे योग आहेत. सुख, समृद्धीने आयुष्य थोडं सोपं झाल्याचे जाणवेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील. संततीसाठी प्रयत्न करत असल्यास यश मिळू शकते.

कन्या रास (Kanya Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या मंडळींसाठी सूर्याचे स्थान, लाभदायक ठरू शकते. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास किंवा तुम्ही इतर व्यवसायात गुंतवणूक केली असल्यास परदेशी कामाची संधी मिळू शकते ज्यामुळे नेहमीपेक्षा दुपट्टीने पैसे कमावता येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून एकमेकांसह सुखाचे क्षण अनुभवता येऊ शकतात. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक, कौटुंबिक सुधारू शकते व ज्याचा प्रभाव तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येऊ शकतो.

हे ही वाचा<< २७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची प्रगती कुणी अडवू शकत नाही; दुप्पट शक्तीचा गजकेसरी योग देईल लक्ष्मीकृपा

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या स्थितीनुसार काही अत्यंत फायदेशीर प्रसंग अनुभवता येतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भूतकाळातील काही गोष्टी लाभदायक ठरू शकतात. जेवढी मिळकत वाढेल तेवढाच खर्च सुद्धा वाढू शकतो यामुळेच आपल्याला बजेटवर लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाधिक खर्च हा तुम्ही पूर्वनियोजित पद्धतीने नियंत्रणात ठेवायला हवा. एखाद्या नव्या कामाची सुरुवात होऊ शकते. वाडवडिलांच्या संपत्तीचा सुद्धा लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)