Aajche Rashi Bhavishya, 17 July 2025 In Marathi : आज १७ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग जुळून येईल. रात्री ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत रेवती नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ मिनिटांनी सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर रेवती नक्षत्रात तुमचे भाग्य कसे चमकणार हे जाणून घेऊया…

१७ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Rashi Bhavishya In Marathi, 17 July 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

मनात हेतु ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर