17 January 2024 Marathi Panchang Daily Horoscope: आज १७ जानेवारी म्हणजेच पौष महिन्यातील सप्तमीला रवी योग जुळून आला आहे. शनीच्या कुंभ राशीतील गोचराला सुद्धा आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. अशावेळी तुमच्या राशीच्या भाग्यात आज नेमके कोणते बदल होणे अपेक्षित आहे हे पाहूया. पाहा १७ जानेवारीचं मेष ते मीन राशींचं आजचं भविष्य..

मेष:-घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारखे काम करता येईल. घराची स्वच्छता ठेवाल. वैचारिक बाजू सुधारेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

वृषभ:-जवळचा प्रवास मजेत पार पडेल. विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल. कंजूषपणा कराल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कर्क:-आवडत्या गोष्टी कराल. आपली उत्तम छाप पडेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

सिंह:-मनाची चंचलता वाढेल. नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. नसती काळजी करत बसू नका. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद संभवतात.

कन्या:-कर्तेपणाचा मान मिळवाल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. भावंडांचा विरोध जाणवेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी.

तूळ:-तुमच्यातील परोपकारीपणा दिसून येईल. आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. लेखकांना उत्तम लिखाण करता येईल.

वृश्चिक:-आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मदतीचे समाधान कमवाल. कमतरता भरून निघायला मदत होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

धनु:-अचानक धनलाभाची शक्यता. रेस,जुगार यातून लाभ संभवतो. मनाची चंचलता लक्षात घ्यावी. सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी.

मकर:-पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल. चार नवीन गोष्टी जाणून घेता येतील.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. व्यवहारी विचार कराल.

हे ही वाचा << ३६५ दिवसांनी कुंभ राशीत बुधादित्य योग; ‘या’ राशींच्या मंडळींना मिळेल लाडू-पेढे वाटण्याची संधी! दारी येईल लक्ष्मी

मीन:-वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. विशेष अधिकार हातात येतील. घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर