Horoscope Today in Marathi, 18 May 2025 In Marathi : १८ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी आहे. पंचमी तिथी रविवारी सकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. रविवारी संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत उत्तराषाढ़ा नक्षत्र जागृत असणार आहे. त्यानंतर सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत शुक्ल योग जुळून येईल. राहू काळ ४:३० वाजता सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. १८ मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर रविवार तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेऊया…
१८ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today in Marathi, 18 May 2025)
मेष राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya in Marathi)
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya in Marathi)
हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya in Marathi)
पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.
कर्क राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya in Marathi)
अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya in Marathi)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Rashi Bhavishya in Marathi)
मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.
तूळ राशिभविष्य (Libra Rashi Bhavishya in Marathi)
सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Rashi Bhavishya in Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Rashi Bhavishya in Marathi)
तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान
मकर राशिभविष्य (Capricorn Rashi Bhavishya in Marathi)
शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Rashi Bhavishya in Marathi)
सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मीन राशिभविष्य (Pisces Rashi Bhavishya in Marathi)
मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर