1st June Panchang & Marathi Rashi Bhavishya: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जून २०२४ ला द्रिक पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी व दशमी तिथी असणार आहे. शनिवारी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत नवमी तिथी असणार आहे तर संपूर्ण शनिवार व रविवारी सकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत दशमी तिथी असणार आहे. आजच्या दिवशी प्रीती योग जुळून आला आहे. रविवारी पहाटे ३ वाजून १२ मिनिटांपर्यंत उत्तर भाद्रपद नक्षत्र सुद्धा जागृत असणार आहे. सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. तर सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपासून ते १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे, अन्यथा महिन्यातील हा पहिला शनिवार शुभ असणार आहे. तुमच्या राशीच्या नशिबात आज नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

१ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

वृषभ:-सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.

मिथुन:-आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

कर्क:-मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्‍यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.

सिंह:-विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेम वीरांनी नसते साहस करू नये.

कन्या:-कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केन्द्रित राहील.

तूळ:-मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

वृश्चिक:-प्रेमप्रकरणाला कलाटणी लागू शकते. उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

धनू:-महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.

मकर:-बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धानी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.

हे ही वाचा<< ६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?

कुंभ:-महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अती हटवादीपणा चालणार नाही. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

मीन:-मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर