2026 Horoscope: वैदिक पंचांगानुसार २०२६ सालच्या सुरुवातीला अनेक ग्रहांची हालचाल होऊन राजयोग आणि शुभ योग तयार होतील. यात सूर्य (ग्रहांचा राजा) आणि शुक्र (धन देणारा ग्रह) यांचे नाव आहे. या दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने शुक्रादित्य राजयोग बनेल. त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील. मनही आनंदी राहील. चला तर मग पाहू या, त्या लकी राशी कोणत्या आहेत…

मेष राशी (Aries Horoscope)

शुक्रादित्य राजयोग तयार झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होत असल्याने बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहकार्य मिळेल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. जुने प्रोजेक्ट्सही यशस्वी होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक नात्यांमध्येही समजूतदारपणा आणि साथ राहील. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि एखादी मोठी डीलही पूर्ण होऊ शकते.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

आपल्यासाठी शुक्रादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या धनभावात तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक पैशाचा लाभ होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही नवीन उर्जेने कामात यश मिळवाल. सकारात्मक विचारांमुळे तुमच्यासमोर नवीन संधी येतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांनाही अडकलेले पैसे मिळू शकतात.

मीन राशी (Pisces Horoscope)

आपल्यासाठी शुक्रादित्य राजयोग इनकम आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या ११व्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नवीन-नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि बचतीत चांगले परिणाम मिळतील. अडकलेले पैसे मिळाल्याने मनाला समाधान मिळेल. तसेच या काळात तुम्हाला शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीतही फायदा होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)