Trusted Zodiac Signs : कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो. कारण विश्वासाच्या जोरावर नाती किंवा व्यवहार टिकतात. एकदा का कोणावरून विश्वास उडाला, की मग त्या व्यक्तीशी बोलताना १० वेळा विचार करावा लागतो. तुमच्याबरोबर असणारा मित्र प्रत्येक वेळी तुमच्या भल्याचाच विचार करीत असेल, असे नाही. त्यामुळे केवळ मित्रच नाही, तर कोणावरही विश्वास ठेवताना खूप काळजी घेतली पाहिजे. पण आज ज्योतिषशास्त्रानुसार, आम्ही तुम्हाला अशा पाच राशींच्या व्यक्तींबद्दल सांगणार आहोत की, ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करूनही विश्वास ठेवू शकता.

या राशींचे लोक कोणतंही नातं फार विश्वासानं निभवतात. ते नात्यांना मौल्यवान हिऱ्यापेक्षा कमी मानत नाहीत. या लोकांचं हृदय अथांग समुद्रासारखं असतं. जर तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट त्यांच्याशी शेअर केली, तर ते नेहमीच तुम्हाला चांगला सल्ला देतील; तसंच तुम्ही शेअर केलेल्या सीक्रेट गोष्टी ते कोणासमोरही बोलणार नाहीत. या राशींची चिन्हे त्यांच्या विश्वासार्हता, निष्ठा व विवेकासाठी ओळखली जातात.

१. वृश्चिक

जेव्हा कोणत्याही गोष्टी गुपित ठेवण्याचा प्रश्न येतो तेव्हा वृश्चिक रास विवेकाचे प्रतीक म्हणून उत्कृष्ट मानली जाते. या राशीच्या चिन्हात रहस्ये आणि इतरांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. एकदा तुम्ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला, तर तुमच्या अनेक गोपनीय गोष्टी कोणासमोरही उघड होत नाहीत. या राशीचे लोक एकमेकांच्या गोपनीयतेचा आदर करतात.

२. कर्क

या राशीचे लोक दयाळू स्वभावासाठी ओळखले जातात. कर्क राशीचे लोक बिनशर्त प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. जेव्हा एखादी गुपित गोष्ट त्यांना सांगितली जाते, तेव्हा ते तिची इतर कुठेही वाच्यता न करता, एखाद्या अमूल्य खजिन्याप्रमाणे मनातच ठेवतात. त्यांना त्यांच्या प्रियजनांप्रति अतूट प्रेम, निष्ठा असते. कर्क राशीचे सहकारी तुमच्या स्वायत्ततेचा आदर करतात. ते त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या हितासाठी जगाशीही खोटे बोलण्यास तयार होतात.

३. कन्या

जेव्हा एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याची वेळ येते तेव्हा कन्या राशीचे लोक चांगले मानले जातात. कारण- या राशीचे लोक वचनबद्ध आणि विश्वासार्ह असतात. ते केवळ तुमची गोपनीय माहितीच मनात ठेवत नाहीत; तर ते तुम्हाला अनेक उत्तम सल्लेदेखील देऊ शकतात. तुमचा आयुष्यावरील भार हलका करण्यासाठी ते मदत करतात. कन्या राशीचे लोक व्यक्तीची समस्या सोडवत, तिचे सांत्वन करतात. बौद्धिक पराक्रमासाठी ओळखले जाणारे कन्या राशीचे लोक अत्यंत हुशार आणि विश्वासार्ह असतात. कोणत्या गोष्टीची सार्वजनिकरीत्या चर्चा करावी किंवा करू नये हे त्यांना नीट समजते. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता की, ते तुमची कोणतीही गुपित गोष्ट सुरक्षित ठेवत, तुम्हाला अनेक आव्हानांना समोरे जाण्यास मदत करतील.

४. मकर

जेव्हा तुम्ही मकर राशीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या गुपित गोष्टी सर्वांत सुरक्षित व्यक्तीकडे आहेत हे जाणून तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकता. मकर राशीच्या व्यक्ती अधिक विश्वासू असतात. ते तुमच्या गुपित गोष्टींचा आधार घेत, तुमचा विश्वासघात करणार नाहीत. परंपरा, नैतिकता व अखंडता यांच्या तीव्र भावनेने प्रेरित, हे पृथ्वी चिन्ह प्रामाणिकपणा आणि निष्ठा उच्च मानते.

मकर राशीचे लोक एखाद्याचा विश्वास तोडणे आणि त्यांचे रहस्य उघड करण्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात हे जाणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या अनेक वैयक्तिक बाबी मकर राशीच्या व्यक्तीशी शेअर केल्यात तरी त्या बाबी ते अत्यंत आदरपूर्वक मनात ठेवून, त्या कुठे उघड होणार नाहीत याची काळजी घेतील.

५. वृषभ

वृषभ हे विवेकबुद्धीचे प्रतीक आहे. या राशीचे लोक तुमच्या अनेक सीक्रेट गोष्टी पोटात ठेवतात; जेणेकरून तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. तुमचे रहस्य उघड करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला किंवा जबरदस्ती केली गेली तरीही वृषभ राशीचे लोक तुमचा विश्वास तोडणार नाही. ते धीरगंभीर आणि सावध स्वभावासाठी ओळखले जातात. ते तुमचे म्हणणू सहानुभूतीपूर्वक ऐकतील आणि गरज पडल्यास ते मदतही करतील. एखाद्या गोष्टीची इतरांकडून माहिती काढण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. परंतु, अशा परिस्थितीत वृषभ राशीचे लोक त्यांना सांगितलेल्या काही गोष्टी इतरांना सांगत नाहीत.

(वर दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता डॉट.कॉम त्याची पुष्टी करीत नाही.)