8th April 2024 Panchang & Horoscope: आज ८ एप्रिलला हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाचा शेवटचा दिवस आहे. फाल्गुन शुक्ल पक्षातील अमावस्येला म्हणजेच आज ५४ वर्षातून येणारे दुर्मिळ सूर्यग्रहण सुद्धा लागणार आहे. सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांपासून ते ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहू काळ कायम असणार आहे. आज उत्तर भाद्रपद नक्षत्र सक्रिय असणार आहे. चंद्र आज संपूर्ण दिवस मीन राशीत स्थिर असणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

८ एप्रिल पंचांग: वर्षातील शेवटचा दिवस तुम्हाला कसा जाणार?

मेष:-अती श्रमाचा थकवा जाणवेल. खोट्याचा आधार घेऊ नका. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा. आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.

वृषभ:-सामाजिक कार्यात मदत नोंदवाल. दिवस घरी गडबडीत जाईल. घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. कष्टाला पर्याय नाही.

मिथुन:-गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल. सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.

कर्क:-अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक चंचलता जाणवेल. मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. लेखन कार्य चांगल्या प्रकारे करता येईल.

सिंह:-कामानिमित्त प्रवास घडेल. सहकार्‍यांवर तुमचा दबदबा राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कन्या:-क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच जपावे. कामात द्विधावस्था आड आणू नये. जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.

तूळ:- नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

वृश्चिक:- घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कामाचा व्याप वाढता राहील. नवीन व्यावसायिक योजना अमलात आणाव्यात. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

धनू:-ताण मुक्तीसाठी ध्यानधारणा करावी. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मुलांचे भरभरून कौतुक कराल. कामातून उत्तम समाधान लाभेल.

मकर:-धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल. योग्य अंदाज बांधता येईल. सर्व गोष्टी चौकसपणे विचारात घ्याल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल.

कुंभ:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

हे ही वाचा<< ५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

मीन:-नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल. कामात तत्परता दिसून येईल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8th april last day of hindu calender mesh to meen rashi bhavishya solar eclipse astrology surya grahan 12 rashi horoscope today svs
First published on: 07-04-2024 at 19:02 IST