8th February 2024 Marathi Horoscope: आज ८ फेब्रुवारी २०२४ ला पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. विशेष म्हणजे आजच्या या शुभ दिवशी श्रावण नक्षत्रात सिद्धी योग जुळून आला आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा लाभ होण्याची शक्यता आहे हे पाहूया..

मेष:-कौटुंबिक सौख्य जपावे. उगाचच चीड-चीड करू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. गुरु कृपेचा लाभ होईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील.

1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान
Budh Shukra Conjunction
एप्रिलमध्ये ‘या’ राशींचे नशीब पालटणार? १ वर्षांनी ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ बनल्याने मिळू शकतो बक्कळ पैसा

वृषभ:-जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास संभवतात. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. कला जोपासायला वेळ द्यावा. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो.

मिथुन:-खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.

कर्क:-मुलांशी मतभेद संभवतात. वात-विकाराचा त्रास जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांचे मत समजून घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल.

सिंह:-घरातील शांतता जपावी. कर्ज प्रकरणे पुढे ढकला. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. मुलांची प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

कन्या:-जवळचे मित्र भेटतील. लहान प्रवास घडेल. कामाला अधिक हुरूप येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. बौद्धिक दिमाख दाखवाल.

तूळ:-वाहन चालवताना काळजी घ्यावी. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आवडी-निवडी बाबत जागरूक राहाल. बोलतांना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक खर्च वाढेल.

वृश्चिक:-रागाचा पारा चढू देवू नका. आततायीपणा करू नये. इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. योग्य तारतम्यता बाळगावी. घरात मानाने राहाल.

धनू:-मानसिक चंचलता जाणवेल. घरातील जबाबदारी उचलाल. गोड बोलून कार्यभाग साधावा. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घशाचा त्रास संभवतो.

मकर:-स्वत:चे स्वत्व राखून वागाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. कणखरपणा ठेवावा. मित्रांशी वाद संभवतात.

कुंभ:-इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. सर्वांशी हसून-खेळून वागाल. छंदाला अधिक वेळ द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. व्यावसायिक बदल कराल.

हे ही वाचा<< शनी- शुक्राने बनवलेले बलाढ्य राजयोग भरतील ‘या’ राशींची तिजोरी; कुंडलीत आहे श्रीमंती, पण मार्ग कोणता?

मीन:-वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सामाजिक बाबीत पुढाकार घ्याल. मुलांची प्रगती दिसून येईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर