Daily Horoscope In Marathi, 11 July 2025 : आज ११ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा आहे. प्रतिपदा रात्री २ वाजून ९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री ८ वाजून ४४ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत उत्तराषाढ़ा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ १०:३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर लक्ष्मी कृपेने शुक्रवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया…
११ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi, 11 July 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका. घरगुती कामात अधिक वेळ जाईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
कामाच्या व्यापाने थकून जाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. वात विकारांचा त्रास जाणवेल. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. कमिशनचा चांगला लाभ मिळेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
सकारात्मक विचाराने वागावे व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अति साहस करायला जाऊ नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर