Daily Horoscope 22 July 2025 In Marathi : आज २२ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी उद्या सकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल. संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिन आहे आणि आषाढ महिन्यातील दुसरे भौम प्रदोष व्रत असणार आहे. प्रदोष व्रत हे शंकराला समर्पित असतात. तर आज तुमच्या राशीची मनोकामना पूर्ण होणार का जाणून घेऊया…
२२ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 22 July 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
आज काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. अभियांत्रिकी क्षेत्रामधील व्यक्तींना लाभ होईल. वेळेचा अपव्यय करू नका. धार्मिक कामात मन गुंतवाल. परिस्थितीत सुधारणा होईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
ताण व त्रस्तता घालवावी. कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे. दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
एकतर्फी वाद वाढवू नका. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
खाद्यपदार्थात रमून जाल. पोटाचे विकार सतावतील. मनातील निराशा दाटून येऊ शकते. करियर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा. प्रयोगशील राहावे लागेल. आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरदारांची समस्या मिटेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
आराम हराम आहे, हे ध्यानात घ्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उगाचच चिडचिड करू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. नियोजनात फारसा बदल करू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
काही कामे त्वरेने आवरती घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील. कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या स्वरुपात बदल करण्याचा विचार कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कमी वेळेत कामे पार पडतील. तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
कामात काहीसा उत्साह जाणवेल. निर्णय चांगले संकेत देतील. घरगुती कामावर भर द्याल. जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
व्यावसायिक गणित जुळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. मनाची चंचलता दूर सारावी. धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
जवळचे मित्र समजून घेतील. बोलताना भान राखावे. अन्यथा नुकसान संभवते. चांगली संगत ठेवावी. हतबल होण्याची आवश्यकता नाही.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
आर्थिक बाजू सुधारेल. समाधानकारक घटना घडतील. अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका. योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर