Guru Planet Margi 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्श्यचित वेळाने राशी परिवर्तन करतो. जेव्हा हे ग्रह मार्गी होतात तेव्हाच त्यांचा प्रभाव मानवी जीवनावर होऊ लागतो. यावेळी १२ वर्षानंतर बृहस्पती म्हणजेच गुरु आपल्या स्वराशीत मीन मध्ये वक्री झाले आहेत. २४ नोव्हेंबरला गुरु इथून मार्गी होणार आहे. गुरूच्या मार्गक्रमणाने अत्यंत लाभदायक असा राजयोग तयार होत आहे. यामुळे सर्व राशींवर कमी अधिक फरकाने प्रभाव दिसून येणार आहे मात्र अशा तीन राशी आहेत ज्यांना केंद्र त्रिकोण राजयोगामुळे धनलाभ व करिअरमध्ये यशस्वी होण्याची प्रबळ संधी मिळणार आहे. यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात…

वृषभ

केंद्र त्रिकोण राजयोग वृषभ राशीसाठी परिणामकारक ठरू शकते. गुरूच्या गोचरने आता यापुढे काही काळ गुरु ग्रह वृषभ राशीच्या कुंडलीत ११ व्या स्थानी असेल. हे स्थान गुरूच्या लाभाचे मानले जात असल्याने याकाळात आपल्याला नोकरीत प्रगतीची मोठी संधी आहे. याकाळात कमाईचे अन्य स्रोतही उपलब्ध होऊ शकतात. जर का आपण कुठल्या व्यवसायाशी जोडलेले असेल तर त्यातही लाभाची चिन्हे आहेत. जर तुमची कोणती प्रलंबित बिजनेस डील असेल तर ती मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असल्याने तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही आणि एकंदरीतच फिरायला जाणे, कुटुंबासह वेळ घालवणे यासाठी वेळ काढता येईल परिणामी मानसिक आरोग्य सुद्धा सुधारण्याचे संकेत आहेत. जर कोणत्या दुर्धर आजाराने आपण त्रस्त असाल तर त्यातूनही आराम मिळू शकतो.

मिथुन

केंद्र त्रिकोण राजयोग मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. मार्गिक्रमणानंतर गुरु मिथुन राशीच्या दहाव्या प्रभाव क्षेत्रात स्थान घेणार आहे. विशेषतः नोकरीच्या दृष्टिकोनातून मोठे बदल व फायदे होण्याची संधी तुम्हाला लाभू शकते. जर नोरी बदलण्याच्या विचारात असाल तर हा काळ सर्वाधिक प्रयत्न यशस्वी होण्यासारखा आहे. तुम्हला आहे त्या नोकरीतही पदोन्नती मिळू शकते. एखाद्या नव्या जबाब्दारीसह आर्थिक मिळकत वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या इच्छा व प्रयत्नांना यश लाभण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्याप कमी नफा जास्त अशी फायद्याची डील मिळू शकते पण आपण त्यासाठी स्मार्ट काम करण्याची गरज असेल.

कोजागिरी पौर्णिमेपासून ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी असणार खुश; धन, समृद्धीचं चांदणं तुमच्या नशिबात आहे का?

कर्क

गुरूच्या मार्गिकारामनाने बनलेला केंद्र त्रिकोण राजयोग कर्क राशीतील स्त्रियांसाठी अधिक भाग्यशाली ठरू शकतो. तुमचे नशीब उजळून टाकणारा हा योग असू शकतो त्यामुळे या काळात तुम्ही स्वतः कुठल्याच कामात हार मानू नका. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ देण्याचे काम गुरु करेल. मार्गिक्रमणाने गुरु कर्क राशीच्या नवव्या प्रभावात असेल. तुमच्या भाग्यात परदेशवारीचे योग आहेत तसेच लग्नासाठी इच्छुक तरुण तरुणींना मनासारखा जोडीदार लाभू शकतो.

केवळ या तीन राशींसाठीच नव्हे तर अन्य राशींच्या अशा व्यक्ती ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी या परदेशी कंपनीशी निगडित आहेत त्यांना मोठ्या लाभाची संधी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यास तुमच्या कठीण परिश्रमांना नशिबाचा हातभार लागू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहेत यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)