Shravan 2023 Lucky Zodiac Sign In Marathi: श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आषाढ अमावस्येनंतर यंदा तब्बल ५९ दिवसांचा श्रावण महिना असणार आहे. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. अधिक मासामुळे यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही १८ जुलै रोजी होणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा १९ वर्षांनी श्रावण महिन्यात दुर्लभ योग जुळून आला आहे. श्रावण महिना हा शिवशंकराच्या भक्तांसाठी खास मानला जातो.. त्यात यंदा अधिक श्रावण मास आल्याने महादेव सुद्धा आपल्या भक्तांना शुभ लाभ मिळवून देऊ शकतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ५ राशींना यंदाचा श्रावण अत्यंत लाभदायक जाऊ शकतो. या दोन महिन्यात पाचही राशींना विविध मार्गातून धनसंपत्ती मिळू शकते. राशीनुसार हे मार्ग कोणते हे पाहूया…

श्रावणात ‘या’ राशींना लाभणार महादेवांची कृपा?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

वृषभ राशीसाठी श्रावण अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. या मंडळींना आवडीच्या कामात यश मिळाल्याने कामाचा हुरूप वाढू शकतो. कौटुंबिक व वैवाहिक आयुष्यात नातेसंबंध दृढ करणारी घटना घडू शकते. प्रेमाचा माणूस आयुष्यात आल्याने जगण्याचा नवा दृष्टिकोन लाभू शकतो. स्वप्नात जगताना वास्तव विसरू नका. बजेटचा विसर पाडणारी परिस्थिती सांभाळून हाताळायला हवी.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

मिथुन राशीला यंदा शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली असल्याने श्रावणात त्यांना शंकराची कृपा दुप्पटीने लाभू शकते. तुम्हाला परिश्रमाचे गोड फळ मिळू शकते. नेहमीच्या घाई व पळापळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊ शकाल. तुमच्या नातेवाईकांना व प्रिय व्यक्तींना मदतीची गरज भासू शकते यावेळी तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम बदलायला लागू शकतात.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीसाठी श्रावण महिना अनुकूल ठरू शकतो. तुम्हाला प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे पार करता येऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. तुम्हला एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. मात्र तुम्ही त्यात यशस्वी झाल्यास तुम्हाला आयुष्य बदलणारी संधी मिळू शकते.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

श्रावणात तूळ राशीचा भाग्योदय होऊ शकता. जीवनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात ज्यामुळे तुम्ही नेहमीच्या वाटेवरून वेगळे होऊ शकता पण तुम्हाला यातून मोठी प्रगती करता येऊ शकते. तुम्हाला तुमच्या वेळेचे नियोजन नीट करावे लागेल. कुंडलीत विवाहाचे योग आहेत.

श्रावण व अधिक श्रावण महिना कधी सुरु होतोय? श्रावणी सोमवार रक्षाबंधनासह प्रमुख सणांच्या तारखांची यादी

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

श्रावण महिना धनु राशीला नोकरीत यश मिळवून देणारा ठरू शकतो. काम व वैयक्तिक सुख यात ओढाताण होऊ शकते तुम्ही योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. धनु राशीला आई वडिलांच्या रूपात आर्थिक पाठबळ लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)