Shukra-Guru Nakshatra Yuti After 23 Years:ज्योतिषशास्त्रानुसार, पुनर्वसु नक्षत्राचा अधिपती ग्रह गुरू आहे आणि याच शुभ नक्षत्रात यंदा गुरू आणि शुक्र यांची दुर्मीळ युती होणार आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण २३ वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती घडत आहे. त्याआधी २००२ साली अशी युती झाली होती. १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी शुक्र पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करील आणि १३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ४४ मिनिटांनी गुरूही या नक्षत्रात प्रवेश करील. १३ ते २३ ऑगस्ट या १० दिवसांत गुरू-शुक्राची महायुती प्रभावी राहणार आहे. ज्योतिषानुसार, ही ग्रहस्थिती काही राशींना अपार आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती व जुनी कर्जे फेडण्याची संधी देणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, त्या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींच्या घरात होणार धनवर्षाव?
मेष
मेष राशीच्या लोकांचे नशीब खुलणार आहे. बराच काळ अडलेली कामे पूर्णत्वाला लागू शकतात. आर्थिक स्थितीत मजबुती येऊ शकते. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन संधींचा वर्षाव होईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांचे दिवस आता बदलणार आहेत. व्यापारी वर्गाला मोठा नफा होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक चणचण दूर होऊ शकते . दीर्घकाळापासून त्रासदायक असलेल्या गोष्टींचा शेवट होऊ शकतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घरात सुख-समृद्धी नांदू शकते.
धनू
धनू राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. अडकलेले प्रकल्प किंवा व्यवहार पूर्ण होऊ शकतात. लवकरच तुमचे धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा करिअरमधील सुवर्णकाळ असेल. नवीन नोकरीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. जे लोक चित्रपट, मनोरंजन किंवा मीडियामध्ये काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. कार्यक्षेत्रात नाव आणि यश दोन्ही मिळू शकते.
२३ वर्षांनंतर येणारी गुरू-शुक्राची ही पुनर्वसु नक्षत्रातील युती अत्यंत शक्तिशाली मानली जाते. ज्यांच्या कुंडलीत या ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आहे, त्यांच्यासाठी हा काळ आयुष्य बदलून टाकणारा ठरू शकतो. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. कारण- असा शुभ योग पुन्हा लवकर येणार नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)