Navpancham Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रहांची चाल ठरावीक वेळेच्या अंतराने बदलते. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून येतात. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात एक असा योग तयार होतोय, जो तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माण होतोय. हा योग म्हणजे ‘नवपंचम राजयोग’ जो शनी आणि बुध यांच्या संयोगातून तयार होतोय. विशेष बाब म्हणजे या योगाचा तीन भाग्यवान राशींच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार आहे. करिअर, पैसा, प्रतिष्ठा, यश आणि अचानक धनलाभ… सर्व काही एका झटक्यात मिळण्याची शक्यता आहे. पण कोणत्या आहेत त्या राशींचे लोक? जाणून घ्या…

‘या’ राशींच्या लोकांना मालामाल होण्याची संधी

सिंह (Leo)

नवपंचम राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन येतोय. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काळ अनुकूल ठरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना या कालावधीत वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात परदेशात प्रवास करू शकता. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सुख, सोई आणि सुविधा वाढू शकतील.

वृषभ (Taurus)

नवपंचम राजयोग वृषभ राशीच्या मंडळींसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन संधी मिळू शकेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मुलांच्या संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या प्रकल्पावर काम करीत असाल, तर त्याला गती आणि यश मिळू शकते. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन उंची गाठू शकाल. व्यवसायिक लोकांसाठी ही वेळ बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यास उपयुक्त आहे. जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल. दाम्पत्य जीवन सुखमय राहील.

मकर (Capricorn)

नवपंचम राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. या काळात व्यापारात नवीन सौदे होऊ शकतात. बेरोजगारांसाठी नोकरीची नवीन संधी निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारीतून नफा होऊ शकेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले पर्याय मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय होऊ शकाल. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. भौतिक सुख मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)