Kendra Tirkon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतात. ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर व जगावर दिसून येतो. अशातच आता ३० वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये शनिदेव थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहेत, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण अशा ३ राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तर या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.
सिंह रास
केंद्र त्रिकोण राजयोग सिंह राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून सप्तम स्थानात हा योग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. तसेच विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहू शकते. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर शनिदेवाने शश राजयोगाचीही निर्मिती केली आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तुळ रास
केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होणार आहे. तसेच चौथ्या घराचा स्वामीही शनिदेव आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. या काळात मुलांची प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो. तसेच तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
हेही वाचा- ११ ऑक्टोबरपासून कन्यासह ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? बुधादित्य राजयोग बनल्याने होऊ शकताे अपार धनलाभ
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. कारण शनि तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच तुमच्या राशीच्या लग्न स्थानी हा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्वही सुधारु शकते. तर विवाहितांच्या नात्यात नवीनता येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. नोकरदार लोकांची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)