Mangal Vakri 2022: मंगळ ग्रह हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य यांचा कारक आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते, तो धैर्यवान आणि निर्भय असतो आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. मंगळ ग्रह हा सर्व ग्रहांचा सेनापती म्हणूनही ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह ऑगस्ट महिन्यापासून वृषभ राशीत वक्री झाला होता. मंगळाचे संक्रमण आता अशा स्थितीत पोहोचले आहे जिथून काही राशींच्या प्रभाव कक्षेत एक अत्यंत दुर्मिळ योग तयार झाला आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार हा योग यापूर्वी १९७५ मध्ये जुळून आला होता, २०२२ च्या शेवटच्या महिन्याभरात मंगळ अत्यंत बलवान होणार असून याच्या झळा काही राशींना सोसाव्या लागू शकतात. तब्बल ४७ वर्षांनंतर जुळून आलेला हा योग काही राशींसाठी अत्यंत अशुभ काळ घेऊन येणारा ठरू शकतो. या राशींवर नेमका मंगळ संक्रमणाचा नेमका कसा परिणाम होणार हे पाहुयात…

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

Mangal Vakri 2022: मेष

मंगळाच्या संक्रमणाने राशीचक्रातील पहिलीच रास म्हणजेच मेष धोक्यात येऊ शकते. या राशीच्या व्यक्तीस धनहानी सहन करावी लागू शकते तसेच पुढील ८ आठवडे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याचीही शक्यता आहे. अशावेळी कोणत्याही नव्या व्यवसायात किंवा गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये पैसे टाकण्याआधी निदान ४ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्यावर डुग धरून बसलेले शत्रू हे बाहेरून तुमच्या मित्राच्या रूपातच दिसत असतील त्यांच्यापासून सावध राहणे हिताचेठरेल .

Mangal Rashi Parivartan 2022: वृषभ

वृषभ राशीत जवळपास ५० वर्षांनंतर अशा प्रकारे मंगळ गोचर घडून आले आहे. यापुढील काही काळात वृषभ राशीच्या मंडळींना सावधान राहणे हिताचे ठरेल. कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सर्वात मुख्य म्हणजे कर्ज घेणे टाळा व अनिवार्य असल्यास अधिकृत स्रोत तपासून, कायदेशीर पद्धतीने व्यवहार करा. जेणेकरून भविष्यात होणारी धन हानी आधीच थांबवता येईल. मानसिक तणावामुळे पुढील काही काळ अस्वस्थ वाटू शकते अशावेळी योगा व मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करणे हिताचे ठरेल. शक्य असल्यास प्रवास करणे टाळावे.

हे ही वाचा >> लक्ष्मी कृपेने जुळून आला ‘समसप्तक राजयोग’; मंगळ देणार ‘या’ तीन राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी

Mangal Grah Gochar 2022: मिथुन

मंगळ गोचर तुमच्या राशीसाठी वैयक्तिक हानीपेक्षा गंभीर सिद्ध होऊ शकते. मंगळ ग्रहाच्या प्रभावाने भावंडांमध्ये वाद होण्याचे संकेत आहेत. यात तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही योग्यच आहात असे वाटेल पण जर त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी तोडून वागायला सुरुवात केली तर मात्र नात्याला तडा जाण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधातही चढ-उतार दिसत आहेत. आरोग्य जपण्याची गरज आहे.

हे ही वाचा >> शनिने ‘या’ राशींमध्ये तयार केले ३ दुर्मिळ राजयोग; ‘या’ व्यक्तींना धनलाभ, नोकरीत बदल व विवाहाच्या सुवर्ण संधी

Grah Gochar 2022: कन्या

कन्या राशीच्या मंडळींचे आई वडिलांसह किंवा एखाद्या वयस्कर व्यक्तीसह वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारींमुळे खर्च वाढू शकतो त्यामुळे महिन्याचे बजेट अगदी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वादाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. आईची काळजी घ्या.

(टीप – वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)