Akshay Tritiya Special Today’s Horoscope in Marathi, 30 April 2025 : ३० एप्रिल २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी २ वाजून १३ मिनिटांपर्यंत राही. रोहिणी नक्षत्र संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिटांपर्यंत जागृत असेल. दुपारी १२ वाजून २ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेची तिथी आज आहे. आजच्या या शुभ दिनाचे राशीफळ कोणाला मिळणार हे आपण जाणून घेऊया…
३० एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Aajche Rashi Bhavishya, 30 April 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. जुगारापासून दूर राहावे. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अती घाई बरी नाही.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर