Akshaya Tritiya 2024: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया १० मे रोजी साजरी केली जाईल. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ आहे. या शुभदिनी नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करणे खूप उत्तम मानले जाते. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साडे तीन मुहूर्तांपैकी असलेला शुभ मुहूर्त आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? अक्षय्य तृतीयेला नक्की सोने का खरेदी केले जाते? यासंदर्भात जाणून घेऊया..

अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी केले जाते?

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते. तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन, संपत्ती सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होतात. या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे.

अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी या वस्तूदेखील करू शकता

सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहसा खरेदी करायला कोणी जात नाही. अशावेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करूनही त्याचे शुभ फळ मिळवू शकता.

चांदी

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांसोबत असतो. अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख, सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता. यात तुम्ही चांदीची नाणी, चांदीचे दागिने खरेदी करू शकता.

कपडे

जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडेदेखील खरेदी करू शकता. शिवाय या दिवशी नवे कपडे परिधान करणेदेखील लाभदायी मानले जाते.

धान्य

या दिवशी डाळी, तांदूळ, गहू ही धान्यदेखील खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णेचादेखील आशीर्वाद प्राप्त होईल.

हेही वाचा: Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ वेळेत करा नव्या वस्तूंची खरेदी; वाचा शुभ मुहूर्त, तिथी

तांब्या-पितळेची भांडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्ही सोने-चांदीदेखील खरेदी करू शकत नसाल, तर तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्या-पितळेची भांडी किंवा देवांच्या मूर्तीदेखील खरेदी करू शकता.

मातीची भांडी

अक्षय्य तृतीयेला तुम्ही मातीची भांडीदेखील खरेदी करू शकता. या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्याने आर्थिक समस्या भासत नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)