Akshaya tritiya 2025: हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी सोने-चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ दिनी ग्रहांचा दुर्लभ संयोग देखील निर्माण होणार आहे. ज्यात चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी आणि शुक्राच्या उच्च राशी मीनमधील गोचरामुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. या दोन्ही राजयोगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

‘या’ राशींचे आयुष्य बदलणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे दोन्ही राजयोग खूप अनुकूल सिद्ध होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान-सन्मान वाढेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

धनु (Dhanu Rashi)

गजकेसरी राजयोग आणि मालव्य राजयोग धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींनाही हे दोन योग भाग्यकारी ठरतील. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. धार्मिक कामात मन रमेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. पद-प्रतिष्ठेत हवे तसे यश मिळवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)