Aajche Rashi Bhavishya In Marathi, 12 August 2025 : आज १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असेल; त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग जुळून येईल. सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपर्यंत पूर्वाभाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे. श्रावणातील अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आज बाप्पा तुमच्या आयुष्यात कोणती खास गोष्ट घेऊन येणार जाणून घेऊया…

१२ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi, 12 August 2025)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)

जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर