Chandra Grahan 2023 : धार्मिकदृष्ट्या ऑक्टोबर महिना खूप खास आहे. कारण या महिन्यात पितृ पक्ष, नवरात्री, दसरा यासारख्या सणांसह वर्षातील शेवटचे सूर्य आणि चंद्रग्रहणदेखील होत आहे. या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी झाले तर आता दसऱ्यानंतर शेवटचे चंद्रग्रहणही लागणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २८ ऑक्टोबरला लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक काळ वैध असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रहणाच्या काळात चंद्र मेष राशीत असेल. तर या राशीत गुरु आणि राहू आधीपासूनच विराजमान असल्यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येण्याची शक्यता आहे.

कधी लागणार चंद्रग्रहण?

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल.

सुतक काळ –

चंद्रग्रहणाचा सुतक काळ ९ तास आधी सुरू होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार असल्यामुळे २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत पासून सुतक काळ वैध असणार आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा विशेष लाभ होऊ शकतो. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला आश्चर्यकारक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहण्याची गरज आहे. भाऊ-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाऊ शकतो. व्यवसायात वाढ होऊन आर्थिक नफा होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. दीर्घकाळापासून असणाऱ्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते. मानसिक तणावापासून सुटका होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो, ज्यामुळे पैसे खर्च होऊ शकतात.

हेही वाचा- ३० वर्षांनंतर नवरात्रीत ‘या’ राशींना देवीचा विशेष आशीर्वाद मिळणार? अमाप पैसा मिळण्यासह घरात नांदू शकते सुख-समृद्धी

कन्या रास (Virgo Zodiac)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अपेक्षित असलेले यश मिळू शकते. एखादी मोठी कामगिरी पार पाडू शकता. समाजातील मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. चांगल्या आर्थिक स्थितीमुळे बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)