वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध ग्रहामुळे व्यक्तीला चमत्कारी अनुभव येतात. त्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषांच्या मते, जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल, तर चांगली फळं मिळतात. पण ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया जोतिषशास्त्रात स्थिती चांगली करण्यासाठी कोणते उपाय दिले आहेत.

बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी विशेषत: विष्णु सहस्रनामाचे पठण, दुर्गा सप्तशती आणि गणेशाची उपासना विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते. गणेशजींना पूजेत दुर्वा अर्पण केल्याने खूप फायदा होईल. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी मूग, छोटी वेलची, पालक, हिरवे कपडे, हिरवे खाद्यपदार्थ आणि ज्ञानविषयक पुस्तके दान करू शकतात.याशिवाय बुध ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी बुधाच्या मंत्रांचा जप करू शकता.

बीजाक्षरी मंत्र: ॐ बुं बुधाय नम:, तांत्रिक मंत्र: ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:. शक्य असल्यास मंत्राचा उच्चार करताना हिरवे कपडे वापरावेत आणि दर बुधवारी हिरवे कपडे घालावेत.

Astrology 2022: मकर राशीत तयार होतोय चतुर्ग्रही योग, ‘या’ राशींना होणार फायदा

विशेष उपाय: ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला बळ देण्यासाठी कन्यादान खूप महत्वाचे आहे असे सांगितले जाते. हे दान सर्वकाळ शक्य नसल्यामुळे गरीब मुलीचे लग्न होत असेल किंवा कोणत्याही मुलीचे लग्न झाले असेल तर, आपल्या शक्तीनुसार आवश्यक साहित्य दान करा. याशिवाय बुध ग्रहासाठी कन्येची पूजा करणेही खूप महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्ही कन्येची पूजाही करू शकता, यामुळे बुध ग्रह बलवान होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाल किताब उपाय: बुध ग्रहाला बळ देण्यासाठी गच्चीवर किंवा घरात जिथे सूर्यप्रकाश असेल तिथे हिरव्या काचेच्या बाटलीत शुद्ध पाणी ठेवा. त्याला तेथे ७ दिवस ७ रात्री राहू द्या. यानंतर या पाण्याचे सेवन केल्याने बुध ग्रहही बलवान होऊ शकतो.