ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, वैभव, प्रेम, सुख-संपत्तीचा कारक मानले जाते. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींवर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह सध्या कर्क राशीत विराजमान आहे तर येत्या ७ जुलैला सिंह राशीत जाणार आहे. शुक्र ग्रहाचा सिंह राशीतील प्रवेश तीन राशींना शुभ ठरणार आहे, असे मानले जाते. या राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि आयुष्यात सुखसमृद्धी येऊ शकते, असं म्हणतात. आज आपण त्या तीन राशी कोणत्या? जाणून घेऊ या.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीसाठी शुक्रचा गोचर खूप लाभदायक असणार आहे. तुमचे आर्थिक मनोबल वाढेल आणि चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवू शकाल, असे मानले जाते. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींच्या लोकांना कौटुंबिक सुख लाभेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
हेही वाचा : Chanakya Niti : चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी फॉलो कराल तर व्यवसायात कधीच अपयश येणार नाही?
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. असे म्हणतात की या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते आणि अचानक धनलाभ होऊ शकतो. असं म्हणतात की या राशींच्या लोकांना लखपती होण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल आणि बँक बॅलन्स वाढेल, असे मानले जाते.
कुंभ
शुक्र ग्रहाचा गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार, असे मानले जाते. असे म्हणतात, या राशीच्या लोकांना नवीन घर, वाहन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांची सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि आर्थिक प्रगती होणार आहे. विवाहित आयुष्यात गोडवा राहील. कुटुंबाकडून सहकार्य लाभेल, असे मानले जाते.
(टीप: वरील लेख सामान्य निरीक्षणावर आधारीत आहे)