ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनावर ग्रह,गोचर आणि महादशेचा प्रभाव पडतो. ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. त्यानुसार फळं मिळत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. मात्र चांगली स्थिती असली तरी महादशाही तितकीच महत्वाची असते. कुंडलीत भविष्य वर्तवताना अचूक अंदाज येण्यासाठी महादशा आणि अंतरदशा सोबतच ग्रहांच्या संक्रमणावर लक्ष ठेवणे आवश्यक असते. महादशा आणि अंतर्दशामध्ये ग्रह काय परिणाम देत आहेत याची माहिती नसल्यास, अंदाज वास्तविकतेपेक्षा वेगळा असू शकतो.

ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार नऊ ग्रहांची स्वतःची महादशा असून आयुर्मानाप्रमाणे मानुष्याला त्यांच्या आयुष्यात फक्त सात महादशा भोगाव्या लागतात. व्यक्ती ज्या नक्षत्रात जन्म घेतो. त्या नक्षत्राच्या स्वामी असलेल्या ग्रहाची महादशा असते. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात झाला असेल तर सूर्य या नक्षत्राचा स्वामी असल्यामुळे त्या व्यक्तीचा जन्म सूर्याच्या महादशामध्ये होतो. आणि अशा व्यक्तीच्या जीवनात सूर्याच्या महादशा नंतर चंद्राची महादशा आणि नंतर इतर ग्रहांची महादशा येतात.

ग्रहांची महादशा

  • सूर्य- ६ वर्षे
  • चंद्र- १० वर्षे
  • मंगळ- ७ वर्षे
  • राहु- १८ वर्षे
  • गुरू- १६ वर्षे
  • शनि- ९ वर्षे
  • बुध- १७ वर्षे
  • केतु- ७ वर्षे
  • शुक्र- २० वर्षे

Astrology 2022: छाया ग्रह केतू तूळ राशीत मांडणार दीड वर्षे ठाण, ‘या’ चार राशींना होणार फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादशा आणि अंतर्दशामधील परिणामांच्या संदर्भात, ज्योतिषशास्त्र हे देखील सांगते की, जेव्हा लाभदायक ग्रहांची महादशा फिरते तेव्हा लाभदायक ग्रहांची अंतरदशा शुभ फल देते, तर अशुभ ग्रहांची अंतरदशा अशुभ परिणाम देते. अशुभ ग्रहाच्या महादशामध्ये अशुभ ग्रहाची अंतरदशा फलदायी असते, तसेच अशुभ ग्रहाची अंतरदशाही शुभ फल देते.