वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. आता छाया ग्रह केतू मंगळाचे अधिपत्‍य असणार्‍या वृश्चिक राशीतून १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:१८ वाजता शुक्राचं अधिपत्य असलेल्या तूळ राशीत प्रवेश करेल. केतू ग्रह सुमारे दीड वर्षांनी राशी बदलतो. केतूच्या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु चार राशी आहेत त्यांना विशेष लाभ होऊ शकतो.

मकर: केतू तुमच्या राशीच्या अकराव्या स्थानात भ्रमण करेल. यावेळी तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. यासोबतच अनावश्यक खर्चालाही आळा बसेल. तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता. हा तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. व्यवसायात चांगला नफा होईल आणि तुम्ही आनंदी राहाल. एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
mars gochar 2024 mangal transit in pisces these zodiac sign get more profit
१८ महिन्यांनंतर मंगळ मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना अच्छे दिन; धनसंपत्तीत होऊ शकते भरभराट
is fear of banana extinction over Genetic variety developed in Australia will be decisive
विश्लेषण : केळी नामशेष होण्याची शक्यता टळली? ऑस्ट्रेलियातील संशोधन कसे ठरले फायदेशीर?

कर्क: केतू ग्रह तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला सुखाचे आणि माता स्थान म्हणतात. त्यामुळे केतूची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. ज्यांना विविध भाषा शिकण्यात रस आहे किंवा अनुवादक म्हणून करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमची बढती होऊ शकते. विवाह जमण्यास हा काळ अनुकूळ आहे.

कन्या: तुमच्या कुंडलीत केतू दुसऱ्या म्हणजेच पैसा आणि वाणीच्या स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक लेखन क्षेत्रात आहेत किंवा कंटेंट रायटर आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता.

Numerology: अंकशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या

कुंभ: तुमच्या कुंडलीत केतू नवव्या म्हणजेच भाग्यस्थानी प्रवेश करेल. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. तसेच ज्यांची वेतनवाढ थांबली होती, त्यांना यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.