शनिची महादशा ही सर्वात क्लेशदायक मानली जाते. ज्याच्या कुंडलीत शनि कमकुवत स्थितीत असतो, त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चूक होण्याची शक्यता जास्त आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान देण्यात आले आहे. त्याच्या नजरेतून कोणीही सुटू शकत नाही, असं वरदान भगवान शिवाने शनिदेवाला दिले आहे. शनिच्या दृष्टीतून देवही सुटू शकत नाहीत. त्यामुळे शनिदेव नेहमी नजर खाली ठेवतात. मान्यतेनुसार शनि महादशेदरम्यान काही काम करू नयेत. यामुळे शनिदेव कोपतात. पण विशेष उपाय केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या काय आहेत ते उपाय…

शनि क्षीण झाला की कपाळाची चमक नाहीशी होते आणि कपाळावर काळेपणा दिसू लागतो. याशिवाय डोळ्यांखाली काळे डाग, गालावर काळेपणा, नखे कमकुवत होऊन तुटतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात कुटुंबात सतत त्रास होत असेल, विशेषत: शनिवारी तुम्हाला खूप राग येत असेल. तर शनिची दशा चालू असण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमची कुंडली दाखवा आणि उपाय करा. जेव्हा शनिचा प्रभाव असतो तेव्हा सर्वांशी वाद होतात. ज्या व्यक्तीवर शनिदेवाची दशा चालू असते, त्यांनी कधीही कोणत्याही गरीब, रुग्ण किंवा कष्टकरी व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच, या काळात इतरांनी कमावलेल्या पैशाकडे पाहू नये, लोभी होण्याचे टाळावे. कोणताही प्राणी, पक्षी आणि पर्यावरणाची हानी करण्यापासून परावृत्त राहिलं पाहीजे.

Astrology: कुंडलीत हा अशुभ योग असेल तर मेहनत करूनही यश मिळत नाही, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेवाच्या मंत्रांचाही जप करावा. याशिवाय एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. शक्य असल्यास शनिवारी सात प्रकारचे धान्य घेऊन हे धान्य डोक्यावरून सात वेळा फिरवा. मग हे धान्य चौकात असणाऱ्या पक्षांना द्या.