Surya Dev Lucky Rashi :हिंदू धर्मामध्ये रविवार सूर्य देवाचा दिवस मानला जातो. या दिवशी विधिपूर्वक सूर्य देवाची पूजा करणे उत्तम मानले जाते. याशिवाय अशी मान्यता सुद्धा आहे की नियमित स्वरुपात सकाळी अंघोळ करणे आणि सूर्य देवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे सूर्य देवाची कृपा नेहमी आपल्यावर दिसून येते. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवांना ग्रहाचा राजा मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत स्थितीमध्ये असेल तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा सूर्य मजबूत स्थितीमध्ये असतो तेव्हा तो शुभ फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तीन अशा राशी आहेत, ज्यांच्यावर नेहमी सूर्य देवाची विशेष कृपा दिसून येते. सूर्य देवाच्या कृपेमुळे या राशींच्या लोकांना मनाप्रमाणे करिअर मिळू शकते. जाणून घेऊ या यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का?

हेही वाचा : मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार

मेष राशी (Mesh Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशी सूर्यदेवाची प्रिय राशी मानली जाते. मेष राशीच्या लोकांवर नेहमी सूर्यदेवाची कृपा दिसून येते. त्यांना मनाप्रमाणे करिअर प्राप्त होते. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ प्राप्त होते. या राशीचे लोक अत्यंत धाडसी आणि ऊर्जावान असतात. जीवनाच्या आव्हानांना ते खूप सोप्या पद्धतीने सामोरे जातात. त्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम असते.

सिंह राशी (Singh Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देवाची पुढील प्रिय राशी सिंह आहे. सिंह राशी ही सूर्य देवाची स्वत:ची राशी आहे. अशात या राशीच्या लोकांवर सूर्य देवाची कृपा दिसून येते. सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते आत्मविश्वासाच्या जोरावर यश प्राप्त करतात. त्यांना कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. सिंह राशीचे लोक करिअरमध्ये खूप यश प्राप्त करतात.

हेही वाचा : Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु राशी (Dhanu Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशी ही सूर्य देवाची प्रिय राशी मानली जाते. धनु राशीच्या लोकांवर सूर्य देवाची विशेष कृपा दिसून येते. सूर्य देवाच्या कृपेमुळे व्यवसायात भरपूर लाभ दिसून येतो. आर्थिक लाभ सुद्धा दिसून येतो. अचानक धन लाभ होण्याची शक्यता असते. हे लोक अतिशय आत्मविश्वासाने जीवन जगतात. या राशीच्या लोकांना व्यावसायिक दृष्ट्‍या बुद्धी अधिक असते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)