Astrology And Numerology August 2025 : कुंडलीशास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती आणि तिचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे अंकशात्रात सोप्या गणिताचा आधार घेऊन व्यक्तीचे विविध पैलू आणि मानसिकता जाणून घेता येते. संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साह्याने घेऊ शकतो. या संख्याशास्त्रात १ ते ९ अंकांची किमया आहे आणि या किमयेमध्ये पडद्याआड नऊ ग्रह उपस्थित असतात. त्यामुळे तुमची जन्मतारीख दोन अंकांमध्ये असेल, तर तुम्हाला ती एका अंकात रूपांतरित करावी लागते. उदाहरणार्थ- तुमची जन्मतारीख ११ असेल तर १+१=२. म्हणजे तुमचा मूलांक २ आहे. तर, ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या आधारे कोणत्या मूलांकासाठी ऑगस्ट २०२५ हा महिना शुभ असणार आहे ते जाणून घेऊया…
कोणत्या मूलांकासाठी ऑगस्ट २०२५ महिना शुभ असणार? (August Horoscope for Birthdates)
मूलांक १
तुमची जन्मतारीख १, १०, १९, २८ असेल, तर तुमचा मूलांक १ मानला जातो. या मूलांकावर सूर्याचा प्रभाव असतो. त्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व आणि आत्मविश्वासाची भावना प्रबळ असते. तर ऑगस्ट २०२५ मध्ये मेष आणि सिंह राशीत मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे मूलांक १ असलेल्या लोकांना करिअरमध्ये प्रगती, नवीन जबाबदाऱ्या आणि आदर मिळणार आहे. तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.
मूलांक ४
ज्यांचा वाढदिवस महिन्याच्या ४, १३, २२, ३१ तारखेला असतो; त्यांचा मूलांक ४ असतो. ४ अंकावर राहू ग्रहाचा अंमल असतो. ऑगस्ट २०२५ मध्ये या जन्मतारखा असणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा, नवीन योजनांमध्ये यश आणि सामाजिक वर्तुळात विस्तार मिळणार आहे. संयम आणि रणनीतीने घेतलेले निर्णय या अंकासाठी फलदायी ठरणार आहे.
(उल्हास गुप्ते ज्योतिषाचार्य यांनी सांगितल्यानुसार काही संख्याशास्त्र अभ्यासक ४ अंकावर राहू ग्रहाचा अंमल आहे असे मानतात. पण, जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रतज्ज्ञ कीरो माँट्रोज स्ट्रायहॉर्न (montrose Strayhorn) यांच्या लिखाणानुसार ४ मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर हर्षल ग्रहाचा अंमल (प्रभाव) आहे. )
मूलांक ५
कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या अंकावर बुध ग्रहाचा अंमल असतो. या जन्मतारखा असलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना प्रवास, शिक्षण आणि नवीन भागीदारीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ऑनलाइन व्यवसाय किंवा परदेश प्रवासातून नफा आणि सामाजिक कार्यातही तुम्हाला आदर मिळेल.
मूलांक ६
तुमचा वाढदिवस ६, १५, २४ या तारखांना येत असेल, तर तुमचा मूलांक ६ आहे. या मूलांकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. ऑगस्ट २०२५ मध्ये मूलांक ६ असलेल्या लोकांना करिअरमध्ये यश, नवीन नोकरीच्या संधी आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा जाणवणार आहे. सेवेद्वारे केलेले काम तुम्हाला विशेष फायदे देतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यतासुद्धा दिसते आहे.
मूलांक ९
तुमची जन्मतारीख ९, १८, २७ असेल, तर तुमचा मूलांक ९ आहे. मंगळ ग्रहाच्या मालकीचा हा मूलांक धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. २०२५ ची एकूण बेरीज ९ येते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात धाडसी निर्णय घेतले, तर तुम्हाला नक्की यश मिळेल आणि नातेसंबंधांमध्ये स्थिरता येण्यासाठी संयम आवश्यक असेल.