Aja Ekadashi 2025 Date And Time : पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे. वर्षभरात एकूण १४ एकादशी येतात. पण, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ‘अजा एकादशी’ म्हणून साजरी केली जाते. एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे एकादशी व्रताचे महत्त्व खूप मोठे आहे. तर ऑगस्ट महिन्याची एकादशीची योग्य तारीख, योग, शुभ वेळ काय याबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात…
शुभ मुहूर्त – वैदिक कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १८ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी ‘अजा एकादशीचे’ व्रत पाळले जातील. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचा मुहूर्त सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी २ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असेल.
पूजा कशी कराल?
- अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा.
- भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवून त्यांच्यासमोर बसा.
- विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा सुरू करा.
- पूजेदरम्यान भगवान श्रीकृष्णाचे भजन म्हणा.
- नैवैद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करून पूजा पूर्ण करा.
- उपवास ठेवला असेल तर द्वादशी तिथीला रात्री उपवास सोडा.
शुभ योग – भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला सिद्धी योग, शिव योगासह इतर अनेक शुभ योग तयार होत आहेत. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःखे नष्ट होऊ शकतात, इच्छापूर्ती आणि भौतिक सुख मिळू शकते अशी मान्यता आहे.