Baba Vanga all Predictions list: २०२५ मध्ये बाबा वेंगा यांची बरीचशी भाकिते खरी ठरली आहेत. त्या भाकितांनुसार मानवजातीचे मोठे नुकसान झाले आहे. २०२५ मध्ये झालेल्या युद्धांमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, म्यानमारच्या भूकंपात १५०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. नैसर्गिक आपत्तींमुळे कहर निर्माण होत आहे. युरोपीय संघर्ष, भारत व पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती, अवकाशातील जगात नवीन शोध, पूर, ढगफुटी, जंगलातील आगी, ज्वालामुखीचा उद्रेक आणि इतर आपत्तींबद्दलचीही अनेक भाकिते २०२५ मध्ये खरी ठरली आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांच्या भविष्यातील भाकिते खरी ठरण्याचा धोका वाढला आहे, ज्यामध्ये जगाच्या अंताची तारीख देण्यात आली आहे.
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियात झाला आणि त्यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. अगदी लहान वयातच एका आजारामुळे त्यांची दृष्टी गेली; परंतु त्यांना लाभलेल्या भविष्य पाहण्याच्या अभूतपूर्व क्षमतेमुळे त्या जगभर प्रसिद्ध झाल्या. बाबा वेंगा यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या हयातीत त्यांनी केलेली भाकिते अजूनही खरी ठरत आहेत.
बाबा वेंगांच्या ज्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, त्यात ९/११ चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, बराक ओबामा यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे.
बाबा वांगाच्या भविष्यवाण्यांची यादी वाचून थक्क व्हाल
१९८४ : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या.
१९८९ : ‘पोलादी पक्षी’ अमेरिकेवर हल्ला करतात – ९/११ हल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जातो.
१९९६ : ११ ऑगस्ट रोजी स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी.
२००० : कुर्स्क पाणबुडी आपत्ती घडली.
२००१: ९/११ चे हल्ले घडले; त्यांचे स्पष्टीकरण मागे घेतले आहे.
२००४: हिंदी महासागरातील त्सुनामी; मोठ्या सागरी आपत्तीचा अंदाज.
२००८-२०१२: बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून येतील, असे भाकीत केले होते.
२०२५ ते २०३०
२०२५: युरोपमधील मोठे संघर्ष, भूकंप आणि पूर यांसह नैसर्गिक आपत्ती
२०२८ : मानव शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करील, जगातून उपासमार नष्ट होईल.
२०३३ : ध्रुवीय हिमखंड वितळल्यामुळे समुद्राची पातळी लक्षणीयरीत्या वाढेल.
२०४३ : युरोप एक इस्लामिक देश बनेल.
२०४६ : कृत्रिम अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल.
२०६६ : अमेरिका पर्यावरणाचा नाश करणारे शस्त्र शोधून काढेल.
२०७६ : समाजातील जातिव्यवस्था पूर्णपणे रद्द केली जाईल.
२०८४ : निसर्ग स्वतःला पुन्हा निर्माण करण्यास सुरुवात करील.
२०८८ : एका विषाणूमुळे लोक जलद गतीने वृद्ध होतील.
२०९७ : विषाणूवर उपचार शोधला जाईल
२१०० : एक कृत्रिम सूर्य पृथ्वीच्या अंधाऱ्या बाजूला उबदार करील.
२१११ : रोबोट्सचे वर्चस्व असेल.
२१६७ : एका नवीन धर्माला जागतिक लोकप्रियता मिळेल.
२१७० : जगाला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.
२१९५ : पाण्याखाली समुदाय उदयास येतील.
२२७९ : कृष्णविवरे आणि अवकाशातील पदार्थांचा शोध लागेल.
२२८८ : टाइम मशीन्समुळे एलियन्सशी संपर्क साधता येईल.
२२९१ : सूर्य खूपच थंड होईल. मानव त्याला उबदार करण्याचा प्रयत्न करील.
२२९९ : फ्रान्स इस्लामिक राज्यांविरुद्ध गनिमी युद्ध पुकारेल.
२३०२ : न्यायव्यवस्थेत चांगल्या सुधारणा होतील.
२३०४ : मानव चंद्राचा सखोल अभ्यास करील.
२३४१: पृथ्वीला परग्रही लोकांकडून धोका निर्माण होईल.
२३७१ : जगभरात दुष्काळ पडेल.
२४८० : दोन कृत्रिम सूर्यांच्या टकरीमुळे सगळीकडे अंधार पसरेल.
३०१० : एक लघुग्रह चंद्रावर आदळेल, ज्यामुळे धुळीचा एक मोठा ढग दिसेल.
३७९७ : सर्व सजीव प्राणी नाहीसे होतील.
५०७९ : जगाचा अंत होईल.