Baba Vanga Predicted Alien Contact In 2025 : बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा ऊर्फ बाबा वेंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिषी होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात. राजकारण असो किंवा नैसर्गिक आपत्ती यांवर बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी भाकिते केली आहेत. त्यांची अनेक भाकिते पूर्णपणे खरे ठरली आहेत. त्यामुळे २०२५ साठी बाबा वेंगा यांनी धक्कादायक भाकिते केली आहेत. एका भाकितात तर पुढील चार महिन्यांत जग नष्ट होऊ शकते, असं म्हटलं आहे. त्या भाकितात त्यांनी म्हटले होते, “एलियन पृथ्वीशी संपर्क साधतील”. जरी शास्त्रज्ञ १०० वर्षांहून अधिक काळ अशा अलौकिक प्राण्यांचा म्हणजेच एलियनचा शोध घेत आहेत; पण त्यांना यश आलेले नाही. त्याशिवाय अवकाशात सुरू असलेल्या खगोलीय हालचाली पाहता, असे दिसते की, बाबा वेंगा यांनी एलियनबद्दल केलेली भाकिते या वर्षी खरी ठरू शकतात.
बाबा वेंगा काय म्हणाले?
२०२५ सालासाठी त्यांनी केलेल्या एलियनशी संबंधित भाकितामुळे त्यांचे नाव अलीकडेच ट्रेंडिंगमध्ये होते. बाबा वेंगा यांनी २०२५ साठी अनेक अशुभ भाकितांची मालिका केली आहे, ज्यापैकी बहुतेक भाकिते कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विनाश आणि मृत्यूंशी संबंधित आहेत. बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, २०२५ मध्ये ‘एलियन’ पृथ्वीला भेट देतील. या भाकितामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे आणि काहींचा असा विश्वास आहे की, पृथ्वीकडे वेगाने येणाऱ्या ३I/ATLAS या गूढ वस्तूच्या शोधामुळे हे भाकीत खरे ठरू शकते.
हा कथित परग्रही 3I/ATLAS नावाचा एक महाकाय पिंड आपल्या सौरमालेतून वेगाने जात आ,हे. जो ताशी १.३ लाख मैल वेगाने फिरत असल्याचे वृत्त आहे. त्याचा आकार १०-२० किलोमीटर असल्याचा अंदाज आहे, जो एखाद्या मोठ्या शहराच्या आकाराइतका आहे. चिलीमध्ये दुर्बिणीचा वापर करून, एका शास्त्रज्ञाने ३आय/एटलास शोधला आणि त्याचा वेग व मार्गक्रमणामुळे त्याच्या उत्पत्तीबद्दल आणि पृथ्वीवरील संभाव्य धोक्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे एलियन अंतराळयान आहे का?
हार्वर्डचे प्राध्यापक ए. व्ही. लोएब यांच्यासह काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, 3I/ATLAS याच्या असामान्य वैशिष्ट्यांमुळे ते एक एलियन अंतराळयान असू शकते. दरम्यान, काहींचे म्हणणे आहे की, तो एक लघुग्रह किंवा धूमकेतू असू शकतो. या अभ्यास अहवालामुळे ऑनलाइन वादविवाद सुरू झाला आहे की हा तोच परग्रही संपर्क आहे का, ज्याबद्दल बाबा वेंगा बोलत होते. म्हणजेच जर असे घडले, तर गूढ संदेशाची आणखी एक भविष्यवाणी फक्त चार महिन्यांत खरी ठरू शकते. तर दुसरीकडे नासाने म्हटले आहे की, 3I/ATLAS हा धूमकेतू आपल्या सौरमंडळाबाहेरील शोधला जाणारा तिसरा ज्ञात पदार्थ आहे. परंतु, नासाने म्हटले आहे की, ते पृथ्वीला त्यापासून कोणताही धोका नाही आणि तो खूप दूर राहील.