आजही अनेकांना वास्तुशास्त्राच्या नियमांची माहिती नाही. यामुळेच ते दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम होतो. वास्तूचा प्रभाव घरापासून बाहेरही दिसून येतो. त्यामुळे वास्तूचे माणसाच्या जीवनावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. सहसा लोक घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. खरं तर या चुका आयुष्यावर खूप वजन करतात. त्यामुळे जीवनात आर्थिक समृद्धी, यश आणि प्रगती थांबते. अशा स्थितीत जाणून घ्या कोणत्या चुकांमुळे हे घडते.

वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवण करणं योग्य नाही. कारण असं केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या राहतात. सोबतीला अंथरुणावर बसून जेवणाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून जावे लागते. याशिवाय कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात.

वास्तूनुसार रात्री किचनमध्ये घाण भांडी ठेवल्याने धनहानी होते. घाणेरडी भांडी झोपण्यापूर्वी स्वच्छ करावीत. कारण असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

आणखी वाचा : Rahu Dosh: कुंडलीत राहु दोष असल्यास हा उपाय करा, संकटातून मुक्ती मिळू शकते

वास्तुशास्त्रानुसार रात्री स्नानगृहात पाण्याने भरलेली बादली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. दुसरीकडे, स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते.

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर दही, दूध आणि मीठ कोणालाही देऊ नये. असं केल्याने घरात गरिबी राहू लागते. एवढंच नाही तर आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते.

घराच्या ईशान्य दिशेला पूजेचं घर बांधणं शुभ असतं. याशिवाय कलशात पाणी नेहमी ईशान्य दिशेला ठेवावं. असं केल्यानं जीवनात आनंद मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)