Bhadrapad Purnima Chandra Grahan And Pitru Paksha: हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी, पितृ पक्ष आणि चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार ७ सप्टेंबर २०२५ रोजी पितृपक्षाची सुरूवात होणार असून याच दिवशी भाद्रपद पौर्णिमा तिथी आणि चंद्रग्रहणही आहे. पौर्णिमा तिथीला लक्ष्मी-नारायणाच्या पूजेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करून अर्घ्य देणे शुभ मानले जाते. तसेच पितृपक्षात पितरांचे पिंडदान, श्राद्ध, तर्पण केले जाते. चंद्रग्रहणामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते. ज्यामुळे धार्मिक दृष्टिकोणातूनही या दिवसाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. यंदा हा अद्भूत संयोग अनेक वर्षानंतर निर्माण झाला आहे. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर नक्कीच पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर पडणार सकारात्मक प्रभाव

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा अद्भूत संयोग अत्यंत लाभदायी असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकाटांपासून तुम्ही मुक्त व्हाल. सकारात्मक विचार कराल आणि आयुष्यात पदोपदी यश मिळवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दान-धर्म कराल, धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. पितृपक्षात पितरांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे स्मरण करा.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा अद्भूत संयोद पदोपदी यश मिळवून देईल. ग्रहणाचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडेल. तसेच पितृपक्षाचा काळही तुमच्यासाठी शुभ ठरेल. करिअर आणि व्यवसायात भरभराट होईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण कराल. या काळात कुटुंबातील आनंदाचे वातावरण असेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ अनेक नवे बदल घडवून आणणारा असेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी देखील हा काळ खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)