Venus Transit in Cancer: ग्रह-गोचराचा मानवी जीवनावर खोल परिणाम होत असतो. असाच एक महत्त्वाचा गोचर लवकरच होणार आहे. सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह २१ ऑगस्ट रोजी पहाटे १:०८ वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. असं म्हणतात, जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची अन्य राशींच्या कुंडलीतील स्थितीसुद्धा बदलते. साहजिकच स्थान बदलल्यावर होणारा प्रभावसुद्धा कमी-अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात बदलत असतो. आता या संक्रमणामुळे अनेक राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहेत, विशेषतः तीन राशींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…

‘या’ राशींना मिळणार एकावर एक गोड बातम्या

१. मेष (Aries): नशिबाची साथ लाभणार!

शुक्राचे कर्क राशीतील प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ लाभणार आहे. आयुष्यात नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंदच आनंद येऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन करिअरच्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगती दिसून येऊ शकते. उत्पन्नाचे दरवाजे उघडू शकतात. व्यक्तिगत आयुष्यात सुख-समाधान वाढेल.

२. मिथुन (Gemini): अचानक मोठा धनलाभ

या काळात मिथुन राशीच्या लोकांना अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. मनासारखी नोकरीही या कालावधीत मिळू शकते. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहू शकते.

३. कन्या (Virgo): करिअर, प्रसिद्धी आणि सुख

शुक्राचं हे संक्रमण कन्या राशीसाठी एक सोनेरी संधी घेऊन येत आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक आणि प्रमोशन होण्याची शक्यता. नवीन व्यावसायिक संधी आणि यश मिळेल. प्रगतीचे द्वार खुले होऊ शकतात. अडलेला पैसा परत मिळू शकतो. या कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात खूप सुख लाभू शकते. समाजात मान सन्मान मिळू शकतो.

एकंदरीत शुक्राचं हे गोचर प्रेम, ऐश्वर्य आणि मानसिक समाधान देणारं ठरेल. पण, सर्वात मोठा फायदा वरील तीन राशींना मिळेल. तुम्ही त्या राशींपैकी एक असाल तर स्वतःसाठी हे ‘गोल्डन पीरियड’ समजून योग्य निर्णय घ्या!

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)