Shani Dev And Budh Vakri 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी देवाला विशेष महत्त्व आहे. शनीला कर्म व न्याय यांचा देव म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कर्मानुरूप फळ देणारे शनी हे कलियुगातील दंडाधिकारी आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी सध्या मीन राशीत विराजमान आहेत आणि दुसरीकडे बुध हा बुद्धी, तर्क, संवाद व कलेचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये बुध शुभ स्थानी असल्यास कार्यस्थळी व विशेषतः बुद्धीच्या संबंधित कामांमध्ये विशेष लाभ होण्याची संधी असते. ही मंडळी आत्मविश्वासाने कला क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतात. अशा लोकांमध्ये बुद्धीच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता असते. वैदिक पंचांगानुसार, जुलै महिन्यात न्यायाधीश शनी देव आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे वक्री होणार आहेत. बुध ग्रह व शनी यांच्यात मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे बुध ग्रह व शनी यांचा प्रभाव एकत्रितरीत्या काही राशींना समृद्ध करू शकतो. येत्या काळात तीन अशा राशी आहेत की, ज्यांना या वक्री स्थितीचा फायदा धनलाभाच्या रूपात होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊ…
‘या’ राशींचे भाग्य पालटणार?
वृषभ
शनी आणि बुध या ग्रहांची वक्री हालचाल शुभ सिद्ध होऊ शकते. आपल्या आर्थिक मिळकतीत येत्या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्याला नशिबाची जोरदार साथ लाभू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत, येत्या काळात त्यांच्या प्रगतीचे योग संभवतात. तुम्ही उधार दिलेले पैसे न मागताच, परत मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून आपल्याला प्रचंड लाभ होऊ शकतो. भागीदारीने आपल्याला लाभ होण्याची संधी मिळेल. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो.
मिथुन
शनी आणि बुध ग्रहाची वक्री हालचाल मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. या काळात विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. नोकरदारांना नोकरीबदलाचे संकेत आहेत. आपल्याला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तुमचे आर्थिक स्रोत वाढू शकतात. एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा किंवा वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा वाट्याला आल्याने तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो.
कर्क
शनी आणि बुध या दोन ग्रहांच्या वक्री हालचालीमुळे कर्क राशीच्या मंडळींच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ सुरू होऊ शकतात. कामाची एखादी नवी संधीसुद्धा प्राप्त होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगतीसह आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादे मोठे डील पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून विशेष धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश लाभेल. संपत्तीबाबत खुशखबर मिळण्याची चिन्हे आहेत. विवाहेच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते. घरीदारी आनंदी वातावरण असेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)