Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार, असे म्हटले जाते. जो वाद, व्यवसाय, बौद्धिक क्षमता, शिक्षण, बुद्धिमत्ता इत्यादींचा कारक मानला जातो. बुध सुमारे १५ दिवसांनी राशिबदल करतो. सध्या बुध मिथुन राशीत आहे. परंतु, २२ जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करील. चंद्राच्या राशीत बुधाच्या प्रवेशाने अनेक राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो; पण त्यामुळे कोणत्या राशींना बंपर म्हणजे मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो जाणून घेऊ…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध २२ जून रोजी रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करील, जिथे तो ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहील.

मेष

बुध गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांना अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. आईचे आरोग्य हळूहळू सुधारू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनाही चांगले फायदे मिळू शकतात. जीवनात आनंद येऊ शकतो. तुम्ही कुटुंबासह चांगला वेळ घालवता येऊ शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. स्थावर मालमत्ता, मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते. घर आणि कुटुंबाशी संबंधित अनेक बाबींमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. जीवनात आनंद येऊ शकतो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण अनुकूल ठरू शकते.

कन्या

बुध गोचर कन्या राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकते. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही समाजात तुमची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता. त्याशिवाय रिअल इस्टेट, मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात भरपूर नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आदर मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तसेच समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. बुध ग्रहाच्या प्रभावाने तुम्ही भावंडांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. कोणत्याही कामात केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळू शकते. जर कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचा सामना करावा लागत असेल, तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनू

बुध गोचर धनू राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या राशीचे लोक बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता पुन्हा सुरू करू शकतात. त्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल आणि तुम्ही समाजात एक वेगळी प्रतिमा निर्माण करू शकता. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करून स्वत:चे नाव कमवू शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली पगारवाढ मिळू शकते; पण आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.