Budh Gochar in Tula Rashi: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. या महिन्यामध्ये बऱ्याच ग्रहांच्या राशी परिवर्तनामध्ये बदल होईल. त्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. सध्या बुध सिंह राशीत विराजमान असून लवकरच तो शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
बुध करणार ‘या’ तीन राशींना मालामाल
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीसाठी हा हे गोचर अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. वडिलांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींना हे गोचर लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)