Budh-Guru Yuti Astrology Prediction : प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. या राशी परिवर्तनाचा बारा राशीच्या लोकांवर परिणाम होतो. काही राशींसठी हा शुभ काळ असतो तर काही राशींसाठी हा काळ त्रासदायक ठरतो. येत्या २६ मार्चला बुध आणि गुरूची युती होणार आहे. १२ वर्षानंतर मेष राशींमध्ये हे दोन्ही ग्रह एकत्र दिसणार आहे. बुध ग्रह सध्या मेष राशीमध्ये विराजमान आहे आणि २६ मार्चला गुरू सुद्धा मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.अशात या दोन ग्रहांची युती राशीचक्रातील चार राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण त्या चार राशींविषयी जाणून घेणार आहोत.

मिथुन राशी

मेष राशीमध्ये बुध आणि गुरू ग्रहाची युती मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. या दरम्यान धनप्राप्ती होण्याच शक्यता आहे. नशीबाची साथ मिळाली तर कमावण्याचे स्त्रोत वाढू शकतात. व्यापारांच्या कमाईमध्ये सुद्धा वृद्धी होईल. त्याचबरोबर जे लोकं व्यवसाय करण्याचा विचार करत असेल. त्यांना सुद्धा सुवर्ण संधी मिळू शकते. थांबलेले काम मार्गी लागतील. मुलांशी संबंधित शुभ वार्ता ऐकायला मिळेल. या काळात या लोकांना शेअर मार्केटपासून लॉटरी पर्यंत चांगला नफा मिळू शकतो.

कर्क राशी

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची युती कर्क राशीच्या कर्म स्थानावर तयार होणार आहे. अशात नोकरी आणि व्यवसायात या लोकांच्या मनाप्रमाणे होईल. धनलाभाचा रूर्ण योग बनू शकतो.कामाच्या ठिकाणापासून तर घरापर्यंत तुमचे कौतुक होणार आणि मानसन्मान वाढेल. या काळात या लोकांना मोठे काम मिळू शकते ज्यामुळे भविष्यात त्यांना लाभ होईल.

हेही वाचा : २४ की २५ मार्च होळी नक्की कधी? होलिका दहनासाठी ‘हा’ पावणे दोन तासांचा मुहूर्त सर्वात शुभ, पाहा नियम

तुळ राशी

गुरू आणि बुध ग्रहाची युती तुळ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. ही युती या राशीमध्ये सातव्या स्थानी तयार होत आहे. अशात विवाहित लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळू शकते. नात्यात गोडवा निर्माण होईल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तो हा काळ उत्तम आहे. पैशांची कमतरता असणाऱ्या लोकांची समस्या दूर होईल. कमाईचे नवे स्त्रोत निर्माण होईल. लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.

सिंह राशी

गुरू आणि बुध ग्रहाची युती सिंह राशीच्या नवव्या स्थानावर आहे अशात या लोकांचे नशीब उजळू शकते. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. ज्या कामात अडथळा आणि अडचणी येत असतील ते काम या काळामध्ये पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. देश विदेशात प्रवास करण्याचा योग जुळून येत आहे ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)