Budh Margi in Kark:  श्रावण महिन्यात ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जातो. बुध ११ ऑगस्ट २०२५ रोजी मार्गी होत आहे. दुपारी १२:५९ वाजता कर्क राशीत बुध मार्गी होईल. बुधाच्या या मार्गी स्थितीचा थेट परिणाम १२ राशींवर होणार असून, काहींना त्याचा जबरदस्त फायदा होणार आहे. ज्यांच्या कुंडलीत बुध अनुकूल असेल, त्यांना यश, मान-सन्मान आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींना मिळणार सोन्यासारखा काळ!

मेष (Aries)

बुध ग्रहाचं मार्गी होणं मेष राशींच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे. या राशीच्या मंडळींना कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी अनेक संधी मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. सेल्स, मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. व्यवसायाच्या बाबतीतही मोठी रक्कम मिळू शकते. या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील.

मिथुन (Gemini)

बुध ग्रहाच्या मार्गीमुळे या राशीच्या मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस येऊ शकतात. या कालावधीत व्यवसायामध्ये चांगला नफा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना इच्छित ठिकाणी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. आरोग्याशी संबंधित ज्या समस्या असतील त्या दूर होऊ शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग बनू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. या काळात वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे.

कन्या (Virgo)

बुध ग्रहाची सरळ चाल कन्या राशींच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या काळात स्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायानिमित्त तुम्ही परदेशात जाऊ शकतात. आयात-निर्यात व्यवसायात भरपूर नफा मिळू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विविध मार्गांनी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुखे मिळू शकतात. तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. समाजात आदर, सन्मान वाढू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)